Ad will apear here
Next
तावडे अतिथी भवनाचे शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन


मुंबई : आडिवरे (ता. राजापूर) येथे नव्याने बांधलेल्या तावडे अतिथी भवनाचे उद्घाटन माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते १० मे रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, तावडे संस्थेचे अध्यक्ष दिनकर तावडे, सचिव सतीश तावडे खजिनदार शंकरराव तावडे, उपाध्यक्ष सुहास तावडे, उपाध्यक्ष राजेंद्र तावडे आणि संपूर्ण तावडे परिवार उपस्थित राहणार आहे.      

शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते एक डिसेंबर २०१४ रोजी अतिथी भवनाचे भूमिपूजन झाले होते. त्यानंतर आता  ही वास्तू पूर्ण होऊन आता उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. प्रसिद्ध वास्तुविशारद संतोष तावडे यांनी या वास्तूचे देखणे डिझाइन बनवून उभारले आहे. याकडे वास्तूशिल्पाचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून पाहण्यात येत आहे. सुमारे पंधरा हजार चौरस फूट बांधकाम असलेली बेसमेंट आणि दोन मजली इमारत असून, येथे राहण्यासाठी सुसज्ज आठ रूम, समोर सुंदर उद्यान, सांस्कृतिक व सामाजिक केंद्र आदी सुविधा आहेत. तावडे समाजाचा ८०० वर्षांच्या इतिहासाचा वारसा या वास्तूला लाभला आहे. येथे निसर्गाने केलेली मुक्त उधळण, पुरातन महाकाली मंदिर आणि निवासाची उत्तम सोय यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना व भाविकांना एक पर्वणी ठरणार आहे.

तावडे अतिथी भवनानिमित्त तीन दिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले असून १० मे रोजी सकाळी ११ वाजता लोकार्पणाचा सोहळा, सायंकाळी पाच वाजता बालकीर्तनकार लक्ष्मीप्रसाद शंकर कुलकर्णी (पटवारी) यांचे बालकीर्तन, ११ मे रोजी सकाळी नऊ वाजता कुलदेवता महाकालीला प्रार्थना, सायंकाळी सात वाजता सांस्कृतिक कार्यक्रम ‘मराठी पाऊल पडते पुढे’ असे कार्यक्रम होतील. १२ मे रोजी सकाळी सात ते दुपारी १२ वाजेपर्यंत वास्तुशांती, नवग्रह शांती, होम हवन व इतर धार्मिक विधी, दुपारी २:३० ते ४:३० वाजता लघुरुद्र अभिषेकाचे आयोजन करण्यात आले आहे.

उद्घाटनाविषयी :
दिवस : गुरुवार, १० मे २०१८
वेळ : सकाळी ११ वाजता
स्थळ : तावडे अतिथी भवन, आडिवरे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZVOBO
Similar Posts
‘युवकांनी तावडे समाजाचे कार्य आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यावे’ क्षत्रिय मराठा हितवर्धक मंडळाला ७५ वर्ष असून, क्षत्रिय मराठा हितवर्धक विवाह मंडळाला ५० वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून राजापूर तालुक्यातील आडिवरे गावी नव्याने बांधलेल्या तावडे अतिथी भवनाचा लोकार्पण सोहळा १० मे रोजी शिक्षणमंत्री तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शानदारपणे पार पडला.
‘रत्नागिरी-सिंधुदुर्ग घरबांधणी, घरदुरुस्ती अधिसूचनेत दुरुस्ती’ मुंबई : ‘रत्नागिरी, सिंधुदुर्ग घरबांधणी, घरदुरुस्ती अधिसूचनेमध्ये २०१५पूर्वी बांधकाम परवानगी देण्यासाठी जे नियम व अटी प्रचलित होते तेच पुन्हा लागू करण्यासाठी अधिसूचनेमध्ये दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव तयार करा,’ अशा सूचना ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी अधिकाऱ्यांनी दिल्या.
शरद पवार आठ जुलैला चिपळुणात मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणाच्या दुर्घटनास्थळाला आठ जुलै रोजी भेट देणार असून, या भेटीत ते तेथील ग्रामस्थांशी चर्चा करणार आहेत.
‘...तर राहुल गांधींना विरोध करण्याचा अधिकार नाही’ मुंबई : ‘काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटकमध्ये सांगितले की, त्यांच्या पक्षाला सर्वात जास्त जागा मिळतील त्यावेळी पंतप्रधान पदाची जबाबदारी घेईन. देशातील जनता त्यांना पंतप्रधानपदाची जबाबदारी देणार असेल आणि तसा कौल घेणारच आहेत, तर त्यांना विरोध करण्याचा कुणालाही अधिकार नाही, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language